Blog 5 | HEaL Institute & IJME – Covid-19 Insights | May 5, 2020
द्रोणागिरी | Mohan Des | English Translated by Sangeeta Gandhe
द्रोणागिरी
खूप बरे वाटले !
माझी आठवण काढलीत
नाहीतर मला आख्खा उचलून आणून
माझ्यातले हवे ते उखडून घेऊन
माझा उपयोग करून घेऊन
मला तसेच कुठल्या तरी भूमीवर
टेकवून तुम्ही असेच वरच्या वर मजेत
निघून गेलात..
असे वाटले होते
पण आता या घडीला
पुष्पकातून पुष्पवृष्टी माझ्यावर करण्या पेक्षा
जा, जा तिकडे
अखंड जळणाऱ्या प्रदेशावर
आकांत करणाऱ्या आबाल वृद्धांवर
पाणी फवारा वरून
पोरक्या पोरांना पाण्याचे विमान दाखवा
त्यांच्या डोळ्यांत आनंद पाहा
शेपटीतली आग आता तरी विझवा..
जा…जा तिकडे हायवेज वर
आणि आजूबाजूच्या निबिडातून, शेतातून
उपाशीपोटी चाललेल्या वाटचालीवर जा
अंतरा अंतराने फूड पॅकेट्स टाका
सोबत पाण्याच्या बाटल्याही
आणि सॅनिटरी नॅपकिन्स
त्या अथक रस्त्यांशी बोला
अंतर ठेवून पण आस्थेने बोला
त्यांनीच बांधलेत ते हमरस्ते तुमच्यासाठी
आता तुटक्या पातळ झालेल्या स्लिपर्स मधून
भाजणारे..
माझ्यावरची ही वनस्पती..
ती नाही, ती , ती..तिच्या पुढची
हां, तीच..
तिची थंड पाने बारीक वाटून
त्या तळपत्या तळपायांना लावा
मला कोठेही टाका
मी रुजणार..
कोमेजलो नाहीये मी अजून
जिवंत आहे..
तुमचे आभार पण..
मला माझे काम निर्विघ्न करू द्या
माझ्यावर पाकळ्या फुले उधळण्याची वेळ
अद्याप आलेली नाहीये
Translated by Sangeeta Gandhe
Feels good !
I was remembered.
Otherwise, I was uprooted
Raided of the essentials,
Used… and left on a forlorn land.
You left, and happily disappeared in the mid-air
I had felt…..
Now, at this moment,
Instead of showering flowers over me, from the pushpak
go, go there….
On the land that is set on fire…
On the vulnerable and old, who are screaming for life
Shower them with water,
Show the orphans the water plane,
Watch their gleaming eyes
At least now, put off the fire from your burning tail.
Go… go there on the highway
And near, ranches and the farms
Where the starved are walking the path
Throw the food packets at a distance,
Along with water bottles and sanitary pads.
Speak to those long roads,
Speak in warmth as you keep the distance,
They have built these roads for you,
Now, that burns through the worn-out slippers…
This plant, grown over me…
No that, that, that, one before that…
Yes, that….
Grind its cool leaves and coat their fiery feet.
Throw me anywhere
I will survive….
I haven’t faded away, yet
I am alive…
Grateful to you.
But…
Let me serve with no hindrances
The time has yet not arrived for a shower of flowers and petals, for me.